नवी दिल्ली | भारतीय बँकांचे सुमारे ९ हजार कोटींचे कर्ज थकवून इंग्लंडमध्ये फरार झालेल्या मद्यसम्राट विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत १० डिसेंबरला (सोमवारी) ब्रिटनच्या न्यायालयात सुनावणी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सीबीआयचे संयुक्त संचालक साई मनोहर यांच्या नेतृत्वाखाली सीबीआय आणि ईडीचे संयुक्त पथक रविवारी (९ डिसेंबर) ब्रिटनला रवाना झाले आहे. यापूर्वी राकेश अस्थाना हे प्रकरण हाताळत होते.
A joint team of CBI and ED led by CBI Joint Director A Sai Manohar has left for UK for court proceedings there on India’s request seeking extradition of Vijay Mallya. Court is expected to pronounce its judgment on Monday. Earlier Rakesh Asthana was leading this case. pic.twitter.com/3lh0EafiSN
— ANI (@ANI) December 9, 2018
गेल्याच महिन्यात मुंबईच्या विशेष मनी लॉन्ड्रिग कायदा न्यायालयात ईडीने विजय माल्ल्याच्या विरोधात याचिका दाखल केली होती. विजय माल्ल्या भारतीय बँकांचे कर्ज न फेडता देशातून परदेशात पसार झाला होता. म्हणूनच मल्ल्याला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ घोषित करावे, अशी विनंती ईडीने या न्यायालयाला केली होती. याबाबत सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
दरम्यान, ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ असा उल्लेख केला जाऊ नये, यासाठी विजय माल्ल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला नोटीस बजावली आहे. विजय माल्ल्याला गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये अटक झाली होती. मात्र, सध्या तो जामिनावर आहे. त्याला अटक करण्यात आली याचाच अर्थ तो फरार नाही. यामुळे ‘फरार गुन्हेगार’ हा शब्द काढावा, असे विजय माल्ल्याच्या वकिलांचे म्हणणे आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.