लंडन | भारतीय बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून इंग्लंडला पळून गेलेल्या विजय माल्या यांना भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या हस्तांतरणासाठी भारताने इंग्लंडकडे अर्ज केला होता. या अर्जाला माल्यांनी कोर्टात आव्हान दिले होते. इंग्लंडच्या हायकोर्टाने मल्ल्याची याचिका फेटाळून लावली. या निर्णयामुळे मल्ल्याचे हस्तांतरण होणार हे निश्चित झाले आहे. भारतीय कोर्टात आरोपी म्हणून जावे लागू नये म्हणून मल्ल्याने ट्वीट करुन कर्ज फेडण्याची तयारी दाखवली आहे.
लॉकडाऊनमुळे संपूर्ण जग आर्थिक कोंडीत सापडले आहे. भारत सरकारने या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर ‘सगळे कर्ज फेडतो पण कोर्ट केस बंद करा’, अशी भूमिका विजय माल्यांनी घेतली आहे. याआधी व्याज माफ केल्यास कर्जाचे सर्व मुद्दल फेडतो असे ट्वीट केले होते. पण मुद्दलाची रक्कम जमा केली नाही.
Congratulations to the Government for a Covid 19 relief package. They can print as much currency as they want BUT should a small contributor like me who offers 100% payback of State owned Bank loans be constantly ignored ? Please take my money unconditionally and close.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) May 14, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.