HW News Marathi
देश / विदेश

गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरुवात; पंतप्रधान बजावणार मतदानाचा हक्क

मुंबई। गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Assembly Election) दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी १४ जिल्ह्यातील ९३ जागांवर आज (५ डिसेंबर) मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह दिग्गज नेते मतदान करणार आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी ८३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपला अहमदाबादमधील ९३ जागांपैकी १६ जागा महत्वाच्या मानल्या जात आहेत. दुसऱ्या टप्प्यात आपने ९३ जागांवर उमेदवार दिले आहेत. तर भाजपने सुद्धा ९३ जागांवर उमेदवार दिले आहे. तसेच काँग्रेसने ९० जागांवर उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त दोन जागांवर आपले उमेदवार दिले असून भारतीय आदिवासी पक्षाने १२ आणि बहुजन समाज पक्षाने ४४ उमेदवार दिले आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी १ डिसेंबर रोजी मतदान झाले. या पहिल्या टप्प्यातील मतदानात ६० टक्के मतदान झाले असून गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल ८ डिसेंबर रोजी लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यात गुजरातचे मुख्यमंत्री भूपिंद पटेल यांचा घाटलोडिया, पाटीदार समाजाचे नेते म्हणून ओळखले जाणारे हार्दिक पटेल यांचे विरमगाम, गांधीनगर दक्षिणमधून भाजपचे अल्पेश ठाकोर, काँग्रेसमधून बनासकांठा जिल्ह्यातील वडगाव मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत शेतकरी आक्रमक, पोलिसांचा लाठीचार्ज

News Desk

ओबीसींना मोठा दिलासा

News Desk

Budget 2022: अर्थसंकल्पानंतर ‘या’ गोष्टी झाल्या स्वस्त

Aprna