HW News Marathi
देश / विदेश

West Bengal Election 2021 : तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपमध्ये कॉंटे की टक्कर, कोण बाजी मारणार?

पश्चिम बंगाल | पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार की पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस सत्तेत येणार?याचे चित्र आज (२ मे) आज हे चित्र स्पष्ट होणार आहे. पश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज समजणार आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झाली असून करोनाच्या संकटातही पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. एकीकडे कोरोनाने कहर केलेला असतानाही मतदानावर याचा फारसा परिणाम झालेला पाहायला मिळाला नाही. राज्यात ८४ लाख ७७ हजार मतदार असून ८० टक्के मतदान झालं आहे.

ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असून पश्चिम बंगालमधील जनता पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या देणार का हे पहावं लागणार आहे. ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवं आव्हान निर्माण केलं आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मैदानात उतरुन जोरदार प्रचार केला आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आव्हानात्मक निवडणुकीला सामोरं जावं लागत आहे.

विधानसभेच्या २९४ जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यांत मतदान झाले होते. सत्तेच्या सिंहासनावर बसण्यासाठी कोण पात्र ठरणार हे आज समजणार आहे. त्यामुळे कोणता पक्ष बहुमताच्या या आकड्यापर्यंत पोहोचणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लखीमपूर हिंसाचारात सिद्धूंना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर मुख्यमंत्र्यांना लखीमपूरमध्ये हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी नाही

News Desk

भारतीय हॉकी संघाचं दमदार पुनरागमन, स्पेनचा ३-० ने पराभव!

News Desk

माझ्या ‘फडणवीस’ असण्यामुळे शरद पवारांनीही भूमिका बदलल्या !

News Desk