HW News Marathi
देश / विदेश

पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह ५ राज्यांच्या निवडणुकांचे बिगूल वाजले, जाणून घ्या तारखा

नवी दिल्ली | केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आसाम, तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर केल्या आहेत. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज (२६ फेब्रुवारी) या पाचही राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. सुनील अरोरा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये ८ तर आसाममध्ये ३ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर तमिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीत एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल.

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून पहिला टप्प्यात २७ मार्चला, दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडेल. तर तिसऱ्या टप्प्यात ६ एप्रिलला, चौथ्या टप्प्यात १० एप्रिलला, पाचव्या टप्प्यात १७ एप्रिलला, सहाव्या टप्प्यात २२ एप्रिलला, सातव्या टप्प्यात २६ एप्रिलला आणि शेवटच्या आठव्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, या निवडणुकांचा निकाल २ मे रोजी लागणार आहे.

आसाम

आसाम राज्यात एकूण ३ टप्प्यात मतदान होणार असून पहिला टप्पा २७ मार्चला, दुसरा टप्पा १ एप्रिलला आणि तिसरा टप्पा ६ एप्रिलला पार पडणार आहे. तर निवडणुकांचे निकाल देखील २ मे रोजीच जाहीर होणार आहेत.

केरळ, तमिळनाडू, पुदुच्चेरी

केरळ, तमिळनाडू, पुदुच्चेरी या तिन्ही राज्यात एकाच टप्पात ६ एप्रिलला मतदान होणार आहे. तर निवडणुकांचे निकाल देखील २ मे रोजीच जाहीर होणार आहेत.

सुनील अरोरा यांनी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे झालेल्या केंद्रीय निवडणुकी आयोगाच्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, आसाम, तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि पुदुच्चेरी या राज्यांतील विधानसभेच्या एकूण ८२४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकांमध्ये तब्बल १८ कोटींपेक्षा अधिक नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखिलेश, लालूप्रसादसह चिराग पासवान यांची सुरक्षा काढली

News Desk

“ड्रग्जचा खेळ गुजरातमधून तर सुरू झाला नाही ना?”; मलिकांचा भाजपला सवाल

News Desk

राजकारण देशाला अस्थिरतेकडे ढकलत आहे ते थांबायला हवे, राऊतांचा मोदींना सल्ला

News Desk