कांकीनारा | पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगना येथील कंकिनारा भागात गावठी बॉम्ब स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहे. या स्फोटात जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भागातील बरुईपाला येथे मृत मोहम्मद मुख्यार आणि त्याचा परिवार, तसेच शेजारी घराबाहेर बसले होते. त्याचदरम्यान कोणी तरी बॉम्ब फेकला.
West Bengal: Two people killed, four injured in an explosion in Kankinara area (North 24 Parganas) last night. Locals says, "Unidentified miscreants lobbed a crude bomb last night. We are scared. There also have been robberies in the area. Demand administration to help us." pic.twitter.com/VxIdl3gAAs
— ANI (@ANI) June 11, 2019
या बॉम्ब हल्ल्यात मुख्तारची पत्नी आणि अनेक लोक गंभीररीत्या जखमी झाले. लोकसभा निवडणुकीपासून पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला आहे. इथे मोठ्या प्रमाणात भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाविवाद होत असते. दोन्ही पक्षांचे कार्यकर्त्यांचा जिवानिशी जात आहेत. तर या दोन्ही पक्षांचे नेतेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कार्यकर्त्यांची हत्या झाली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.