HW News Marathi
देश / विदेश

सेल्फ कोरोंटाईन करताना या बाबी ठेवा लक्षात

नवी दिल्ली | जगभरात कोरोना विषाणू आणि त्याचा वाढता फैलाव दिवसागणिक वाढत चालला आहे आणि त्यामुळे मृत पावणाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू आहे तर ज्या प्रवाशांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाही आहेत त्यांना सेल्फ कोरोंटाईन करण्यास सांगितले आहेत. आता नेमकी सेल्फ कोरोंटाईन म्हणजे काय? तर स्वतः स्वतः ला घरात बंद करून घेणे. मुळात कोरोंटाईन हा शब्द लॅटिन असून याचा अर्थ अलग राहणे किंवा विलगिकरण असा होतो. हा कालावधी ४० दिवसांचा असून यात जर आपल्याला सर्दी, ताप, खोकला झाला असेल तर त्या विषाणूंचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून लोकांपासून दूर राहणे. अशा रुग्णांना रुग्णालयात एक वेगळी खोलीही देण्यात येते.

आधीच्या काळात जहाजांवर असा रुग्ण आढळला तर ते जहाज ४० दिवसांसाठी किनाऱ्यापासून लांब जायचे. ब्रिटनमध्ये प्लेगच्या साथीपासून बचाव होण्यासाठी असा प्रयत्न करण्यात आला होता. घरात स्वतः ला विलगुकरणात ठेवल्याने कोरोना विषाणूची लागण होण्यापासून बचाव होतो अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

कोणी करावे स्वतः ला कोरोंटाईन? आणि कसे?

ज्या व्यक्ती कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्या आहेत. त्यांनी १४ दिवसांसाठी हे करावे. हवा खेळती राहील अशा खोलीत राहावे. खोलीत कोणी असल्यास त्यांच्यापासून लांब राहावे. वृध्द आणि गरोदर स्त्रियांपासून लांब राहावे. मास्कचा वापर करावा आणि ६-७ तासाच्या अंतराने हे मास्क बदलावे. साबणाने स्वच्छ हात धुवावे. या सगळ्या बाबी काटेकोपणे पाळल्याने नक्कीच फरक जाणवू शकतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अलास्कात ७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

News Desk

प्रियांका गांधींना आधी नजरकैद, आता अटक……

News Desk

सिंगापूरमध्ये आज ‘किम-ट्रम्प’ भेट

News Desk