HW News Marathi
देश / विदेश

WhatsAPP वर तलाक

 

हैदराबाद – दुबईतून एका महाभगाने हैदराबादमधील आपल्या पत्नीला व्हॉट्स अपद्वारे ट्रिपल तलाकचा मेसेज पाठवला आहे. या घटनेनं पुन्हा एकदा ट्रिपल तलाकचा मुद्दा पेटायला सुरूवात झाली आहे.

सुमायना नामक महिलेला तिच्या पतीने दुबईवरून व्हॉट्सअ‍ॅवर ट्रिपल तलाक पाठवला. विशेष म्हणजे हा तलाक तिला तित्या वाढदिवसादिवशी पाठवला आहे. व्हाट्स अ‍ॅपवर पाठवलेल्या मेसेजमध्ये त्याने हा तुझा बर्थडे गिफ्ट समज असेही म्हटले आहे. सुमायनाचे 2015मध्ये ओवेस तालिबशी लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली. तेव्हापासून दोघामध्ये वाद सुरु झाला होता. त्यानंतर दोघेही वेगळे राहत होते. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये ओवेसने व्हाट्स अ‍ॅपवरुन तलाक पाठवला होता.

हैदराबाद येथील सनथनगर पोलिस स्थानकात सुमायना नवऱ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सुमायनाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ओवेस तालिब विरोधात 420, 406, 506 १/६ 34 गुन्ह्याची नोंद केली आहे. सुमायनाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, सासू-सासरे आपल्यावर काळी जादू करत होते. तसेच मानसिक आणि शारीरिक छळ सुद्धा करत होते. व्हॉट्सअ‍ॅपवरून तलाकचा मॅसेज आल्यानंतर आपल्या वडिलांनी माहेरी आणल्याचे तिने सांगितले.

मॅसेजमध्ये सुमायनाच्या पतीने लिहिले, तलाक, तलाक, तलाक. हा माझा अंतिम निर्णय आहे. कुणाला घेऊन येतेस आण, कुणाला सांगायेच ते सांग… कुणाचा बापही माझे काही वाईट करू शकणार नाही. तुला हेच हवे होते ना, मी माझा निर्णय बदलणार नाही… घे तुझ्या वाढदिवसाचे गिफ्ट, अशा आशयाचा मेसेज ओवेसनं व्हाट्स अपवर पाठवला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली  

News Desk

अनेक पातळीवरून केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन

News Desk

‘या’कारणासाठी चक्क गडकरी,फडणवीस आणि जयंत पाटील एकत्र!

News Desk