वॉशिंग्टन | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या घातपाताचा डाव उधळून टाकण्यास सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. बराक ओबामा यांच्या कार्यालयात आणि हिलरी क्लिंटन यांच्या निवासस्थानी स्फोटकांची पाकीटे आढळून आली होती. ओबामा यांना बुधवारी तर क्लिंटन यांना मंगळवारी पाकीटता स्फोटके आले होते.
Package identified as `potential explosive device' sent to former President Barack Obama in Washington, reports AP pic.twitter.com/VzozqMYvrK
— ANI (@ANI) October 24, 2018
धक्कादायक बाब म्हणजे ही स्फोटकांची पाकीटे हिलरी यांच्या घरी पार्सलने पाठवण्यात आली होती. सुरक्षा यंत्रणांना याबाबतची माहिती बुधवारी मिळाली होती. यानंतर सुरक्षा यंत्रणांना क्लिंटन यांच्या निवासस्थानी तर ओबामा यांच्या कार्यालयाभोवती सुरक्षा वाढवून स्फोटके नष्ट केली आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर व्हाईट हाऊसकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली.
NYPD & our law enforcement partners responded to reports of a suspicious package at CNN. Officers identified the device that appeared to be a live explosive device. NYPD bomb squad secured the device & removed it for investigation: New York Police Commissioner James P O'Neill pic.twitter.com/SysFtlxlbG
— ANI (@ANI) October 24, 2018
पार्सलने आलेली ही पाकीटे ओबामा किंवा हिलरी क्लिंटन यांनी स्वीकारली नव्हती. तसेच ही पाकीटे थेट त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचू शकली नसती, त्यामुळे त्यांना यातून काहीही धोका नसल्याचे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.