HW News Marathi
महाराष्ट्र

पिंपरीमधील झोपडपट्टीत सिलेंडरचा स्फोट, दोन जणांचा मृत्यू

पिंपरी | चिंचवडमधील दळवीनगर झोपडपट्टीत काल मध्यरात्री ३ वाजता सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटाने परिसरात धावपळ सुरू झाली होती. एका घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. यानंतर ही आग पसरली आणि यात पाच घरे जळून खाक झाली आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

प्रदीप मोटे आणि शंकर क्षीरसागर या सिलेंडर स्फोटात दोघांचा होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत, तर शंकर राऊत, हरी मनोहर, मंगल खरात, शंकर आणि राजाबाई जाधव यांची घरे जळून खाक झाली आहेत. या सिलेंडर स्फोट झाल्याचे कळताच परिसरातील लोकांनी त्यांच्या घरातील सिलेंडर घराबाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमृता फडणवीस यांच्या ट्विटचा चुकीच अर्थ काढू नका – देवेंद्र फडणवीस

News Desk

ठाकरे सरकारची नियतच खोटी, भाजपकडून वीज बिलाच्या रद्दीवरुन सरकारवर टीका 

News Desk

अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी सायकलवरून वाटले सातबारा

News Desk