लडाख | पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यालगतची परिस्थिती बदलण्याबाबत चीनच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, लडाखमधील सुरक्षाविषयक स्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी काल (३ सप्टेंबर) लडाखचा दोन दिवसांचा दौरा सुरू केला आहे. यावेळी त्यांनी अधिकारी आणि जवान जगातील सर्वोत्तम असून आम्ही फक्त लष्कर नाही तर देशालाही अभिमान वाटेल अशी कामगिरी करु असं सांगत चर्चेच्या माध्यमातून वाद मिटेल असा विश्वास व्यक्त केला.
“लेहमध्ये पोहोचल्यानंतर मी अनेक ठिकाणांना भेट दिली. मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसंच तयारीचाही आढावा घेतला. जवानांचं मनोबल उंचावलेलं असून सर्व आव्हानांचा सामना करण्यास ते तयार आहेत. नियंत्रण रेषेवरील परिस्थिती थोडी तणावाची आहे. परिस्थिती लक्षात घेता आम्ही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सैन्य तैनात करण्यात आलं आहे. यामुळे आपली सुरक्षा आणि अखंडतेचं रक्षण होईल,” असंही ते म्हणाले आहेत.
“जवानांना मनौधैर्य उंचावलेलं आहे. कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी आपले जवान त्याचा सामना करण्यासाठी तयार आहेत. मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की आमचे अधिकारी आणि जवान जगातील सर्वोत्तम असून आम्ही फक्त लष्कर नाही तर देशालाही अभिमान वाटेल अशी कामगिरी करु,” असं लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटलं आहे.“गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून चीनसोबत लष्कर तसंच राजकीय स्तरावर चर्चा सुरु आहे. सध्या चर्चा सुरु असून भविष्यातही सुरु राहतील,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
The situation along LAC is slightly tensed. Keeping in view of the situation, we have taken precautionary deployment for our own safety & security, so that our security & integrity remain safeguarded: Army Chief General Manoj Mukund Naravane to ANI on the current situation at LAC pic.twitter.com/B2A6Lmxvoy
— ANI (@ANI) September 4, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.