नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी आज (११ एप्रिल) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांसहीत सर्व मंत्र्यांनी मास्क घातले होते. दरम्यान, या संवादात लॉकडाऊन बद्दल प्रामुख्याने चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
Delhi: Prime Minister Narendra Modi holds a meeting via video-conferencing with the Chief Ministers over #COVID19. pic.twitter.com/yd6mdCzukr
— ANI (@ANI) April 11, 2020
या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. तसेच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवावा यावर भर दिली आहे. आता नेमकी पंतप्रधान काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.