HW News Marathi
Covid-19

जगात कोरोनाबाधितांचा आकडा ३३ लाखांच्या पुढे, जगात १ तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत

मुंबई | जगात कोरोनाने लाखो लोकांना वेठीस धरले आहे. जगात २०० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाने विळखा घातला असून लाखोंच्या घरात बाधितांचा आणि मृतांचा आकडा आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगात कोरोनाबाधितांचा 33 लाख 7 हजारांवर गेला आहे. तर, कोरोनामूळे मृत्यू जालेल्यांची संख्या ही 2 लाख 34 हजार 075 वर पोहोचली आहे. तसेच, एक दिलासादायक बाब म्हणजे जगात 10 लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्तही झाले आहेत. गेल्या 24 तासात 85960 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे तर 5800 जणांचा मृत्यूही झाला आहे.

जगात कोरोनाचा फटका सगळ्यात जास्त अमेरिकेला बसला आहे. जगातील एक तृतीयांश मृत्यू फक्त अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत बाधितांचा आकडा 1095023 आणि मृत्यू झालेल्यांचा आकडा 63856 इतका आहे. त्यानंतर स्पेनमध्ये 239639 जणांना लागण तर 24543 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीत बाधितांचा आकडा 205463 आणि 27,967 जणांचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धारावीत ३४ नवे कोरोनाग्रस्त, एकूण संख्या २७५ वर

News Desk

राज्यात पुन्हा एकदा १५ हजारांच्या पुढे कोरोना रुग्णांची नोंद

News Desk

अरुण गवळींची मुलगी लॉकडाऊनमध्ये अडकणार लग्नाच्या बंधनात

News Desk