HW News Marathi
देश / विदेश

जगनमोहन रेड्डी यांनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

नवी दिल्ली | वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी आज (३० मे) विजयवाडा येथे आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदची शपथ घेतली आहे. राज्यपाल ई. एस. एल नरसिम्हन यांनी रेड्डी यांना विजयवाडा येथील आयजीएमसी स्टेडियमवर आयोजीत भव्य सोहळ्यात मुख्यमंत्रीपदची शपथ दिली. यावेळी फक्त जगनमोहन रेड्डी यांनी शपथ घेतली असून त्यांचे मंत्रीमंडळ येत्या ७ जून रोजी स्थापन करण्यात येण्याची शक्यती आहे. या सोहळ्याला डीएमकेचे अध्यक्ष एम.के. स्टॅलीन, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.

आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर रेड्डी यांनी राज्याचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. जगन मोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशात विधानसभेच्या १७५ पैकी तब्बल १५१ जागांवर देदिप्यमान यश मिळवले आहे. शिवाय लोकसभेच्या २५ जागांपैकी २२ जागा जिंकल्या आहेत. शपथविधी सामारंभापूर्वी रेड्डी यांनी स्थानिक संत महंतांना भेटून त्यांचे आशिर्वाद घेतले. आंध्र प्रदेशमध्ये वाएसआर काँग्रेसने चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीचे डिपोझिट जप्त केला आहे. रेड्डी यांनी शपथविधी समारंभासाठी टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना देखील निमंत्रण दिले होते. परंतु त्यांनी समारंभापासून दुरच राहणे पसंत केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत सरकारकडून टिकटॉक, यूसी ब्राउझरसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी, एएनआयचे वृत्त

News Desk

पंतप्रधान मंगळवारी मुंबईत

swarit

आजपासून भगवान जगन्नाथाच्या रथ यात्रेला सुरुवात

News Desk