हैदराबाद | ‘सेल्फी काढायचा आहे’ असे कारण सांगून एका हल्लेखोराने वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशाखापट्टणम विमानतळावर जगनमोहन रेड्डी यांच्यावर हा चाकू हल्ला झाला असून या हल्ल्यात रेड्डी यांच्या हाताला जखम झाली आहे. दरम्यान, रेड्डी यांच्या सुरक्षा रक्षकांनी या हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे.
Andhra Pradesh: YSRCP chief Jagan Mohan Reddy stabbed on his arm by unidentified assailant at Visakhapatnam Airport today. More details awaited. pic.twitter.com/lUmmMiaQCi
— ANI (@ANI) October 25, 2018
वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी विशाखापट्टणमहून हैदराबादला जात होते. विशाखापट्टणम विमानतळावर असताना एका हल्लेखोराने सेल्फी काढण्याचे कारण सांगून जगनमोहन रेड्डी यांच्यावर चाकूने हल्ला केला आहे. श्रीनिवास असे या हल्लेखोराचे नाव असून तो विमानतळावरीलच एका हॉटेलमध्ये काम करतो अशी माहिती मिळते.
Shocked by attack on Jagan Reddy. Asked all agencies to investigate matter thoroughly,including CISF. Asked secretary civil aviation to fix responsibility. I strongly condemn this cowardly attack,we'll punish the guilty. Investigation underway, tweets Civil Aviation Min S Prabhu pic.twitter.com/NoMB0sfzGR
— ANI (@ANI) October 25, 2018
‘जगनमोहन रेड्डींवरील हा हल्ला अत्यंत धक्कादायक आहे. मी सीआयएसएफश सर्व एजन्सींनी पूर्णपणे या प्रकरणाची तपासणी करण्यास सांगितले आहे. या हल्ल्याचा मी निषेध व्यक्त करतो. आम्ही दोषींना शिक्षा देऊ’, नागरी उड्डाण मंत्री सुनील प्रभु यांनी म्हटले आहे.
Opposition leader Jaganmohan Reddy was attacked at Visakhapatnam airport today. The attacker has been identified as a worker at the airport. He approached Reddy asking him for a selfie & attacked him. He has been taken into custody&inquiry is underway: AP Home Minister NC Rajappa pic.twitter.com/obzg8xICBD
— ANI (@ANI) October 25, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.