HW News Marathi
देश / विदेश

एअर इंडियाचे कर्मचारी भूताला घाबरले

मुंबई – आधुनिक विज्ञानाचा आविष्कार असलेली हवाई सेवा चालविणारे लोकंही भूत-प्रेतासारख्या अंधश्रद्धांना बळी पडत असल्याचे नुकत्याच उघडकीस आलेल्या एका घटनेने स्पष्ट केले आहे. ही घटना आहे जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेतील शिकागो या महानगरामधली! भारतीय विमान वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना येथील एका आलिशान हॉटेलमध्ये चक्क भूताचा वावर जाणवल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे भूत दिसल्यामुळे या कर्मचाऱ्यांची भीतीने इतकी गाळण उडाली की, ते चक्क हॉटेल सोडून पळून गेले. अखेर व्यवस्थापनाला त्यांची व्यवस्था अन्य हॉटेलमध्ये करावी लागली.

‘एएनआय’ वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, एअर इंडियाच्या केबिन क्रू मेंबरना शिकागोच्या हॉटेलमध्ये काही दिवसांपासून विपरीत घटना घडत असल्याचे जाणवते आहे. क्रू मेंबरनी याबाबत पत्र लिहून एअर इंडिया व्यवस्थापनाला याची कल्पना दिली आहे. तसेच क्रू मेंबरच्या डेप्युटी चीफने याबाबत एअर इंडियाला पत्र लिहून कर्मचाऱ्यांना दुसऱ्या हॉटेलमध्ये तातडीने हलवण्यात यावे, अशी मागणीही केली होती. शिकागोतील या हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला असे वाईट अनुभव आले आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. विचित्र आवाज ऐकू येणं, विपरित घडणं याचे अनुभव पावलोपावली कर्मचाऱ्यांनी घेतले. त्यामुळे घबरलेल्या अनेकांनी रात्री खोल्यांमध्ये एकएकटं राहण्यापेक्षा मिळून राहण्याचं ठरवलं.

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून या हॉटेलमध्ये अशा अनेक अघटित घटना घडत असून,कर्मचाऱ्यांच्या मनात खूपच भीती निर्माण झाल्याचंही पत्रात लिहिले होते. जोपर्यंत आपली सोय दुसऱ्या हॉटेलमध्ये करत नाही तोपर्यंत शिकागोला जाणाऱ्या कोणत्याही विमानात नियुक्ती करण्यात येऊ नये, असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या मते SCAM म्हणजे सपा, काँग्रेस, अखिलेश व मायावती  

News Desk

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी दिला पदाचा राजीनामा!

News Desk

मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी सुशांतसिंह प्रकरणाचा वापर !

News Desk