HW News Marathi
देश / विदेश

केजरीवाल पुन्हा एकाकी

नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकाकी पडले आहेत. ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानी यांनी त्यांच्यासाठी वकिली करण्यास असमर्थता दर्शवली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केजरीवाल यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. या प्रकरणात जेठमलानी केजरीवाल यांची बाजू मांडत होते. परंतु त्यांनी हा खटला चालवण्यास नकार दिला आहे. हा खटला लढण्यासाठी जेठली यांना दोन कोटी रुपये मिळणार होते. परंतु ही रक्कम आपणास दिली नाही तरी चालेल असे वक्तव्य केले होते. यावरून गेल्या काही दिवसांपूर्वी मोठे वादंग झाले होते. आता तर जेठमलानी यांनी वकिलपत्र सोडल्याने केजरीवालांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिफ प्रकरणी पर्रिकरांच्या राजीनाम्याची मागणी

News Desk

कार्ती चिदंबरम यांना अटक

swarit

निवडणुकीतील अपयशामुळे सोनिया गांधी नाराज,कोरोना परिस्थितीवरून मोदींवरही बरसल्या !

News Desk