HW News Marathi
देश / विदेश

बीसीसीआयच्या दिल्ली कार्यालयाला कुलुप

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या नव्या प्रशासकीय पॅनलने बीसीसीआयचे दिल्लीतील कार्यालय बंद केले आहे. तसेच बीसीसीआय अध्यक्ष आणि सचिवांच्या कार्यालयालाही आज कुलुप लावण्यात आले आहे.

या दोन्ही कार्यालयात काम करणा-या कर्मचा-यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी बीसीसीआयसाठी प्रशासकीय पॅनलची घोषणा केली होती. कॅगचे माजी अध्यक्ष विनोद राय यांना पॅनलचं अध्यक्ष बनवण्यात आलं आहे. पॅनलमध्ये 4 सदस्यांची नेमणूक करण्यात आली होती. लोढा समितीच्या शिफारशी मानण्यास नकार दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकुर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटवले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

प्रेमात अडचण ठरल्याने प्रेयसीच्या मुलीची हत्या

News Desk

सामान्यांचा कडेलोट करायचा की दिलासा द्यायचा, केंद्राला ठरवावंच लागेल – सामना

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता धोक्यात, तर लोकप्रिय मुख्यमंत्री यादीत उद्धव ठाकरे चौथ्या स्थानावर!

News Desk
मनोरंजन

 नाना पाटेकर शहिदांच्या कुटुंबियांना मदत करणार

News Desk

मुंबई – रूपेरी पडद्यावरील नायकाला अपेक्षित काम प्रत्यक्षात सुरू केलंय अभिनेता नाना पाटेकर यांनी शहिद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्याची इच्छा नाना यांनी व्यक्त केली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नाना यांनी मदतीसंदर्भात घोषणा केली आहे.

, ‘ भारतीय जवान कोणत्‍या परिस्थितीमध्‍ये काम करत असतात, हे सर्वांना ठाऊक आहे. त्‍यांचे कुटुंबही कोणत्‍या मनोभूमिकेत जगत असतील, याचा आपण विचार करु शकतो. विशेषत: शहिद झालेल्‍या जवानांच्‍या कुटुंबावर काय परिस्थिती ओढवत असेल, म्‍हणूनच अशा कुटुंबियांसाठी नाम फाउंडेशन आता 10 कोटी रुपयांचा निधी जमा करणार आहे, असे नाना यांनी मुलाखती दरम्यान सांगितले.

इतकी मोठी रक्‍कम जमा करणे काही सोपे उद्दीष्‍ट नाही. मी वैयक्तिक 50 लाख रुपये देणार आहे. आणखी 9.50 लाख रुपये जमा करायचे आहे. म्‍हणून प्रत्‍येक भारतीयाला माझी विनंती आहे की, जवानांच्‍या सेवेसाठी जमेल तितकी मदत प्रत्‍येकाने करावी. सर्वांनी अगदी मनापासून नाम फाउंडेशनच्‍या मिशनमध्‍ये सहभागी झाले पाहिजे. जेणेकरुन जवानांसाठी आपण काहीतरी करु शकू.’

याव्‍यतिरिक्‍त नाना पाटेकर महाराष्‍ट्रातील दुष्‍काळ पिडीत शेतकऱ्यांसाठी नाम फाउंडेशनसोबत काम करत आहे. अनेक दुष्‍काळग्रस्‍त गावांत नाम फाउंडेशनने जलसंवर्धनाचे काम केले आहे. त्याचे सकारात्मक प्रतिसादही दिसू लागले आहेत.

 

Related posts

क्रिसमस विषयी थोडक्यात…

News Desk

स्टेजवरच फाटला दयाचा लेंगा

News Desk

‘पीएम नरेंद्र मोदी’च्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाची स्थगिती

News Desk