HW News Marathi
देश / विदेश

विमानतळावर नेणार आता ‘हेलिकॉप्टर टॅक्सी’

बंगळुरू – येथे विमानप्रवाशांसाठी प्रथमच हेलिकॉप्टर टॅक्सी सुरूकरण्यात येणार आहे. त्यामुळे विमानात बसण्यापूर्वी आणि विमानातून उतरल्यानंतर वाहतूककोंडीमध्ये होणारा वेळेचा अपव्यय वाचविता येणार आहे. शहरातील कोणत्याही ठिकाणाहून प्रवाशांना पंधराव्या मिनिटाला विमानतळावर येणे आणि विमानतळावरून शहरात नियोजित स्थळी पोहोचणे शक्य होणार आहे.

सध्या बंगळुरूमधील इलेक्ट्रॉनिक सिटीमधील रहिवाशांना याचा लाभ होणार आहे. बंगळुरुमधील एचएएल विमानतळ,व्हाईटफिल्ड एअरपोर्ट येथे, तसेच ज्या इमारतींवर हेलिपॅड आहे अशा ९० इमारतींवर हे हेलिकॉप्टर उतरू शकेल, असे विमानतळ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. इलेक्ट्रॉनिक सिटी आणि विमानतळ यांच्यामधील अंतर ५५ किमी असून प्रवाशांना ते अंतर पार करण्यासाठी दोन तास प्रवास करावा लागतो. तसेच टॅक्सीला या प्रवासासाठी २५०० रुपये मोजावे लागतात. आता हेलिकॉप्टर टॅक्सी सुरू झाल्यावर हे अंतर १५ मिनिटांत कापता येणार आहे.

बंगळुरू विमानतळावरून दररोज ६० हजार प्रवासी प्रवास करतात, त्यातील १०० जणांनी ही सेवा वापरली,रीही ती आर्थिकदृष्ट्या परवडेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या ही सेवा थुम्बे एव्हिएशन कंपनीतर्फे सुरु होत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एका वेळेस सहा प्रवासी बसू शकतील. बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे अधिकारी आणि कर्नाटक सरकारचे उद्योगमंत्री वाणिज्यमंत्री आर. व्ही. देशपांडे यांच्या मते या सेवेला वातानुकुलित टॅक्सीइतका खर्च येईल, असा अंदाज आहे. नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी बंगळुरुप्रमाणे अन्य शहरांमध्येही अशीच हेलिटॅक्सी सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सौरभ गांगुली BCCI च्या अध्यक्षपदी कायम; नवी इंनिग सुरू करणार असल्याची ट्वीटद्वारे दिली माहिती

Aprna

“वेळ पडली तर बेळगावात विरोधीपक्षाच्या नेतृत्वात आंदोलन करु, पण ते येतील का ?” 

News Desk

कृषी विधेयकावरुन सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण  

News Desk