HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।

खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

या काव्यपंक्ती आपण लहानपणापासून वाचत आलो आहोत. झाशीच्या राणीने स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिली. झाशीची राणी म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे घोड्यावर स्वार हातात तलवार पाठीला बाळ बांधलेली एक महिला १८ च्या शतकात स्त्रियांना घराचा उंबरठा ओलांडने देखील शक्य नव्हते.

महिलांसाठी केवळ चूल आणि मुलं इतकेच विश्व होते. महिलांना त्यांचे मत मांडण्याची मुभा देखील नव्हती. आपल्या देशात पुर्वी पासूनच पुरुषप्रधान संस्कृती चालत आली आहे. त्यामुळे आजही कुटुंबातले निर्णय हे फक्त घरातील कर्ते पुरुषच घेतात. २१ व्या शतकात सुद्धा स्त्रीला कमी लेखले जाते. १८ व्या शतकात ज्यावेळी एक स्त्री दुस-या स्त्री ला डोक्यावरचा पदर खाली घेण्यास मनाई करत होती. त्याच १८ व्या शतकात एक रणरागिणी जन्माला आली. ती म्हणजे झाशीची राणी. राणी लक्ष्मीबाई…

लक्ष्मीबाई या मूळच्या साताऱ्या जिल्ह्यातील धावशी गावाच्या. लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे होते. त्यांच्या वडीलांचे नाव मोरोपंत तांबे तर आईचे नाव भागीरथी तांबे असे होते. वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांकडे राहत होते. लक्ष्मीबाईंचा जन्म उत्तर प्रदेश मधील काशी(वाराणसी) येथे झाला. लक्ष्मीबाई चार वर्षांच्या असताना आईचे निधन झाले. त्यांनतर लक्ष्मीबाई वडिलांसोबत पुण्यात राहायला लागल्या. पेशव्यांनी लक्ष्मीबाईंना पोटच्या मुलीसारखे सांभाळले. लक्ष्मीबाईंना ते प्रेमाने छबिली असे म्हणत. लक्ष्मीबाईंचे संपूर्ण शिक्षणही घरीच झाले.

लक्ष्मीबाई यांनी पुण्यात राहून घोडस्वारी, निशाणेबाजी ,तलवारबाजी याचे प्रशिक्षण घेतले. नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व राणी लक्ष्मीबाई हे तिघे जण अश्वपरीक्षेत तरबेज होते. त्याच बरोबर राणी लक्ष्मीबाई यांनी मल्लखांब हा कसरतीचा नवा प्रकार शोधून काढला. ज्या काळात मुली हातात बाहुला बाहुली घेऊन खेळत त्या काळात लक्ष्मीबाईंनी हातात तलवार घेतली होती. राणी लक्ष्मीबाईंचे नेतृत्व चतुर,शूर,धाडसी असे होते.

इ.स १८४२ मध्ये मणिकर्णिकाचे लग्न झाशीचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्यासोबत झाले. माणिकर्णिकांचे नाव लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर सुद्धा लक्ष्मीबाईंनी कसर, व्यायाम, तरवारबाजी सुरूच ठेवली. लक्ष्मीबाईंना मुलगा झाला त्याचे नाव दामोदर ठेवण्यात आले. परंतु तीन महिन्यांनंतर दामोदरचा मृत्यू झाला. गंगाधरराव नेवाळकरांच्या चुलत भावाच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतले व त्याचे नाव दामोदर ठेवले. कालांतराने गंगाधरराव नेवाळकरांचे निधन झाले. त्याच दरम्यान ईस्ट इंडियाने फसवणूक करून झाशी ला आपल्या राज्यांमध्ये सामील करून घेतले. त्यानंतर त्यांना सांगण्यात आले की, झाशी सोडून तुम्ही राणी महाल मध्ये राहायला जा. मैं अपनी झाँसी नहीं दूंगी हा नारा लक्ष्मीबाईंनी दिला. त्यांना त्यांच्या मुलाला राजा म्हणून घोषीत करायचे होते. त्यासाठी राणी लक्ष्मीबाईंनी रणनीती आखण्यास सुरुवात केली.

त्याकाळी विधवा महिलांचे खूप हाल केले जायचे. परंतु राणी लक्ष्मीबाई सगळ्या रूढी परंपरा बाजूला ठेऊन इंग्रजांसोबत दोन हात करायला तयार झाल्या. विधवा स्त्रीला कोणी दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी पुरुषांसारखे कपडे परिधान करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी राज्यातील स्त्रियांची मनवळवणी केली. ब्रिटिशांना घाबरण्याची गरज नाही ते घाबरट आहेत. त्यानंतर त्यांनी सर्व जुन्या विश्वासातील लोकांना परत बोलावून घेतले आणि सर्वांना अधिकार वाटून दिले. ब्रिटिशाना विरोध करणाऱ्या सर्व सैन्यांना आपल्या बाजूला करून घेतले. निकामी तोफा पुन्हा सुरु करण्यात आल्या. दारुगोळ्याची निर्मिती करण्यास सुरुवात केली. याच वेळी महिलांसाठी हळदी-कुंकू यासारखे महिलांचे कार्यक्रम त्या घेऊ लागल्या. महिलांचे सैन्यदल सुरु केले. प्रजेला मुक्त मनाने वावरण्यास कलेची आवड जपण्यास प्रोत्साहन दिले. लक्ष्मीबाईंनी एक समृद्ध राज्य घडविण्याचा प्रयत्न केला. प्रजा व आपल्या मधले नाते घट्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजचा रंग लाल, ‘कालरात्री’ रूपात घ्या देवीचे दर्शन

Gauri Tilekar

आदिशक्तीच्या आभूषणांना हिऱ्यांची सजावट

Gauri Tilekar

आजचा रंग निळा, ‘शैलपुत्री’ रूपात घ्या देवीचे दर्शन

Gauri Tilekar