HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

गिरगावात रंगला ‘होम मिनिस्टर’चा खेळ

मुंबई | नवरात्रीचा उत्सव दिवसेंदिवस अधिक रंगतदार होताना दिसत आहे. मुंबईतील परंपरा जपणाऱ्या गिरगावातील विविध वाड्यांमध्ये वैविध्यपूर्ण खेळांची रंगत वाढत आहे. आकांक्षा प्रतिष्ठान आयोजित आणि महालक्ष्मी होम मेकर्स सहप्रायोजित गिरगाव शारदोत्सवानेही विविध उपक्रमांच्या माध्यमातून गिरगावातील स्त्रियांसाठी खेळ आणि स्पर्धा यांचे आयोजन केले आहे.

या निमित्ताने मुगभाट लेन परिसरात होम मिनिस्टर कार्यक्रम रंगला होता. लहानपणीच्या खेळापासून ते विविध कौशल्य पणाला लावणाऱ्या काही स्पर्धा इथे घेण्यात आल्या. त्यातून अंतिम विजेती निवडून होम मिनिस्टर ठरलेल्या सुषमा मेस्त्री यांना मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रत्येक फेरीत बाद झालेल्या स्त्रियांनाही भरघोस बक्षिसे देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी अगडबम फेम अभिनेत्री तृप्ती भोईर यांची विशेष उपस्थिती हजेरी लावली. भोईर यांच्या आगामी अगडबम या चित्रपटाच्या अनोख्या मेकअपच्या आणि मेकिंगच्या गंमतीजमती स्त्रियांशी संवाद साधताना सांगितल्या. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आर. जे. रश्मी वारंग यांनी केले. आकांक्षा प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष स्वरदा सुदीप नाईक, शिवसेना उपनेत्या मीनाताई कांबळी यांच्या उपस्थितीत माहेरची साडी आणि जमलेल्या स्त्रियांमधून भाग्यवान विजेतीची निवड करत मानाची साडी देऊन स्त्रियांचा सन्मान करण्यात आला. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात अशा उपक्रमांमुळे आनंदाचे क्षण निर्माण होतात अशा भावना उपस्थित स्त्रियांनी यावेळी व्यक्त केल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘विक्रोळीच्या आई शिवाई’चे हे देखणे रूप

swarit

शिवरायांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ

Gauri Tilekar

आव्हानांचा सामना करत ‘ती’ने केले स्वप्न साकार

News Desk
देश / विदेश

मशिदीसाठी हाफिज सईदची मदत, ३ जण एनआयएच्या ताब्यात

Gauri Tilekar

हरियाणा | हरियाणामधील पलवाल जिल्ह्यातील उत्तवार गावामध्ये खुलाफा ए रशीदीन ही मशिद एनआयएच्या रडारवर आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि ‘लश्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईदने या मशिदीच्या बांधकामासाठी आर्थिक मदत केल्याचा आरोप केला जात आहे. २६ सप्टेंबरला एनआयएच्या पथकाने या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून यात मशिदीतील इमाम मोहम्मद सलमान (५२) याचा समावेश आहे. त्याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले होते.

हरियाणामधील पलवाल जिल्ह्यातील खुलाफा ए रशीदीन मशिदीवर एनआयएने ३ ऑक्टोबरला छापा टाकला होता. मोहम्मद सलमानबरोबरच मोहम्मद सलीम आणि सज्जाद अब्दुल वाणी या दोघांना २६ सप्टेंबरला एनआयएकडून अटक करण्यात आली होती. या मशिदीत जमा होणाऱ्या देणग्यांचा कुठे कुठे वापर केला जात होता, याचा तपास सध्या सुरु आहे.

लाहोर येथील फलाह ए इन्सानियत फौंडेशनकडून आर्थिक मदत घेतल्याचा आरोप खुलाफा ए रशीदीन मशिदीच्या पदाधिकाऱ्यांवर केला आहे. यासंदर्भात एनआयएकडून मशिदीच्या पदाधिकाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. या पदाधिकाऱ्यांची बँक खाती, इतर महत्त्वाची कागदपत्रे तपासली जात आहेत. ही मशिद वादग्रस्त जमिनीवर बांधण्यात आली असून मोहम्मद सलमानचा लश्कर ए तोयबाशी संबंध असल्याची माहिती आम्हाला नव्हती, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

 

Related posts

अखेर विजय मल्ल्याच्या भारत प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

News Desk

कोरोनाशी लढण्यासाठी १ लाख ७० हजार कोटींची घोषणा | निर्मला सीतारामण

swarit

साध्वी प्रज्ञाला आठवड्यातून एकदा हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश

News Desk