HW News Marathi
व्हिडीओ

भाजपला नडणाऱ्या सेनेच्या भास्कर जाधवांची अजित पवारांनी थोपटली पाठ !

सोमवारी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. केंद्राकडून इम्पिरिकल डेटा मागवण्यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला तो संमत करताना विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. त्यानंतर अध्यक्षांच्या दालनामध्ये पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ करुन अंगावर धावून जाण्याच्या प्रयत्न करत गैरवर्तन केल्याचा ठपका ठेऊन १२ आमदारांचे निलंबन करण्यात आलं. दरम्यान, या सगळ्या राड्याच्या केंद्रस्थानी असलेल्या शिवसेनेच्या भास्कर जाधवांचे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (६ जुलै) कौतुक केले आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.

#AjitPawar #BhaskarJadhav #UddhavThackeray #DevendraFadnavis #ChandrakantPatil #AshishShelar #MVA #BJP #Shivsena #NCP #Congress #MaharashtraAssembly #MonsoonSession

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Eknath Shinde अडचणीत आल्यास RPI त्यांना पाठिंबा देईल – Ramdas Aathawale

News Desk

“मी पुन्हा आलो आणि इतरांना पण सोबत घेऊन आलो”- Devendra Fadnavis

News Desk

Anil Deshmukh यांची दिवाळी तुरुंगात! जामीनाची शक्यता नाहीच

News Desk