HW News Marathi
व्हिडीओ

Arun Jaitley | माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचा जीवन प्रवास

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज निधन झाले आहे. जेटलींवर ९ ऑगस्टपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. जेटलींना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एम्सकडून त्यांचे १२ वाजून ७ मिनिटांनी निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले. विद्यार्थी नेते ते अर्थमंत्रीपदापर्यंतचा अरुण जेटलींचा प्रवास थक्क करणारा आहे. जेटली यांचा जन्म २८ डिसेंबर १९५२ रोजी झाला होता. अरुण जेटली हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री होते. २००० पासून ते राज्यसभेचे सदस्य होते. ३ जून २००९ रोजी त्यांची राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली होती. मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात अर्थमंत्री म्हणून त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली. या कालावधीत अत्यंत क्रांतिकारी अशा निर्णयांनी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबुती दिली होती. जीएसटीच्या अंमलबजावणीत त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संघटना ही संघटना असते, आमदार आणि खासदार संघटना नसते – Ambadas Danve

News Desk

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी एक कोटींचा मुकुट अर्पण

Manasi Devkar

Amol Kolhe vs Shivajirao Patil | माझा पराभव फक्त छत्रपती संभाजींच्या प्रतिमेमुळे..

Arati More