HW News Marathi
व्हिडीओ

साताऱ्यात तणाव! छत्रपती संभाजी महाराज मार्गाचा बॅनर फाडला, उदयनराजेंनी केलं होतं उद्घाटन

औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नामकरण संभाजीनगर करावे हा वाद पेटलेला असताना साताऱ्यात (Satara) संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील पोवई नाक्यावर लावण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या नावाचे बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. सातारा शहरातील ग्रेड सेपरेटच्या रस्त्याला छत्रपती संभाजी महाराज यांचे बॅनर लावण्यात आले होते. शुक्रवारी रात्री अज्ञात समाजकंटकांनी छत्रपती संभाजीराजे भोसले नावाचा भुयारी मार्गावरील फलक फाडल्याचा प्रकार सकाळी समोर आला. या घटनेमुळे छत्रपती प्रेमींकडून निषेध व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारीच उदयनराजे भोसले यांनी भुयारी मार्गाची पाहणी केली होती. यावेळी त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.

#UdayanRajeBhosale #Satara #BJP #MahaVikasAghadi #SambhurajDesai #DevendraFadnavis #UddhavThackeray #Shivsena #SharadPawar #BalasahebPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडकरांसाठी आनंदवार्ता! सर्वपक्षीय नेत्यांना झाला ‘या’ घटनेचा आनंद

News Desk

Bhagwat karad येताच Pankaja Munde समर्थकांनी सुरु केला राडा…

News Desk

राज्यात वाढतोय Corona!; Kirit Somaiya आणि Nawab Malik म्हणतात, “सावधान, पण घाबरू नका?”

News Desk