HW News Marathi
व्हिडीओ

“Chandrakant Patil BJP | अमेठी जिंकली आता बारामतीही जिंकू ! “

लोकसभा निवडणूकदरम्यान ज्या पद्धतीने अमेठीमध्ये आमचा विजय झाला, त्या पद्धतीने बारामतीदेखील जिंकू, असा विश्वास भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. ते पंढरपुरात भाजपा मेळाव्याच्या निमित्ताने आले होते. या वेळी त्यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले.बारामतीत भाजपचाच उमेदवार निवडणून येणार, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता . मात्र या मतदारसंघातून सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. हे पाहता विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचा पराभव करणे आवश्यक आहे. मात्र आम्ही २०२४ मध्ये नक्की विजय मिळवू असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. ज्या पद्धतीने अमेठीमध्ये मंत्री स्मृती इराणी यांनी जिंकून दाखवले, त्याच पद्धतीने बारामती आमचे लक्ष्य आहे आणि आम्ही बारामती जिंकू ,असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्य न्यायालयात टिकावे यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तरी देखील मराठा आरक्षणाबाबत आणि पावसासह विधानसभेला २२० जागा युतीला मिळाव्यात यासाठी विठोबाला साकडे घातले असल्याची माहिती पाटील यांनी दिली. (बाईट)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडीपासून लोकशाहीला धोका; Chandrakant Patil यांची सरकारवर टीका

News Desk

फडणवीसांच्या ‘या’ घोषणेनंतर रोहिणी खडसे आणि रक्षा खडसे आमनेसामने !

News Desk

Dhiraj Deshmukh Uncut speech | पहिल्याच भाषणात धीरज देशमुख भावुक…

Arati More