HW News Marathi
व्हिडीओ

Dhananjay Munde, Jayant Patil | प्रकाश मेहतांवर कारवाई होणार का ?

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर लोकायुक्त न्यायमुर्ती एम.एल ताहलानी यांनी दोषी असल्याचा ठपका ठेवलाय. मुंबईतील ताडदेव येथील एम.पी.मिल कंपाऊंड एसआरए घोटाळ्याप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना दोषी ठरविण्यात आलेय. लोकायुक्तांच्या या अहवालामुळे मेहता यांचे मंत्रीपद धोक्यात आले आहे. मुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचे एबीपी माझाशी बोलताना मेहतांनी म्हटले आहे. तसेच, केवळ सुत्रांच्या माहितीवरून विरोधकांनी असे आरोप करणे चुकीचे आहे असेही त्यांनी सांगितलेय. विरोधकांनी मात्र या मुद्द्यावरून भाजपावर टीका करणे सुरू केलेय. तर फडणवीस मंत्रीमंडळातील इतर मंत्र्यांची अशीच निःपक्षपाती चौकशी होणार का ? आणि दोषी आढळल्यानंतर आता तरी मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करायचे सोडून प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय तर प्रकाश मेहता यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केलीय. #JayantPatil #DhananjayMunde #PrakashMehta #sachinsawant #M.L.Tahaliyani

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष, नेहमी उध्दव ठाकरेच टार्गेट का ?

News Desk

सरपंचपदाचा लिलाव करताय? सावधान!, आता निवडणूक आयोगाकडून होणार कारवाई

News Desk

शिंदे सरकारला घरचा आहेर; Sanjay Gaikwad यांचे चटणी-भाकर खाऊन आंदोलन

Manasi Devkar