HW News Marathi
व्हिडीओ

‘फडणवीसांचे व्हिडिओ बाहेर काढू’ उद्धव ठाकरेंसाठी धनंजय मुंडे मैदानात!

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सरकारच्या कामाची पोलखोल केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत, ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत धमकीची भाषा वापरल्याचा आरोप करत, धमकी देणारा मुख्यमंत्री आपण पाहिला नसल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. फडणवीसांच्या या टीकेला आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कशा धमक्या दिल्या, याच्या व्हिडीओ क्लिप आहेत. त्या बाहेर काढायला लावू नका’, असा इशाराच धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. ‘उद्धव ठाकरे हे ज्या संस्कारात लहानाचे मोठे झाले. त्यात त्यांना धमकावणं कधी जमलं नाही. एखादी व्यक्ती बदनाम होत नसेल तर त्या व्यक्तीला विविध पद्धतीनं बदनाम करण्याची भाजपची जुनी पद्धत आहे’, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी फडणवीसांवर टीकास्त्र डागलं आहे.
#DhananjayMunde #DevendraFadnavis #BJP #NCP #UddhavThackeray #Mahavikasaghadi #SanjayRaut
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेंग्विन सेनेच्या टीकेवर Aditya Thackeray यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

News Desk

मोदी-उद्धव ठाकरेंची ‘फोन पे चर्चा’, असा’ ठरलाय सत्तेचा फॉर्म्युला? काय आहेत चर्चा?

News Desk

Raj Thackeray भेटीनंतर Ranjeet Savarkar यांची प्रतिक्रिया

News Desk