HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane यांच्या पत्नी Nilam Rane ,मुलगा Nitesh Rane यांच्याविरोधात लुकआऊट सर्क्युलर centre government ने काढले ?

केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांच्या पत्नी नीलम राणे (neelam rane) आणि आमदार नितेश राणे (nitesh rane) यांच्याविरोधात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने लुकआऊट सर्क्युलर काढले आहे. यावर भाजपने टीकास्त्र सोडले असून खुद्द नितेश राणे यांनी आता आमची नाही, तर ठाकरे सरकारची आणि पुणे पोलिसांची चिंता वाढणार असा इशारा दिला. या लुकआऊट नोटीस प्रकरणावर पुणे दौऱ्यावर असलेले राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गृहमंत्री वळसे पाटील पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते. त्या अगोदर राणे कुटुंबीयांविरोधात लुकआऊट सर्क्युलर काढल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याबाबत विचारले असताना वळसे पाटील म्हणाले की, याबाबत केंद्र सरकारने राज्याच्या गृह विभागाला एक पत्र पाठवले होते. ते आम्ही पुणे पोलिसांना दिले. त्यानुसार लुकआऊट सर्क्युलर देण्यात आलेले आहे. या प्रकरणात डीएचएफएलने आर्थिक तक्रार केली होती. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ती तक्रार पोलीस महासंचालकांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी पुणे पोलिसांना याबाबत लूकआऊट सर्क्यु्लर काढण्याचे आदेश दिले. त्यानुसारच ही कारवाई झाली अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील दिली.या प्रकरणी राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडत इशारा दिला आहे. आता राणे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होणार नसून पुणे क्राइम ब्रँच आणि ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ होणार आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. या प्रकरणी आम्ही लवकरच हायकोर्टात जाणार असल्याचेही राणे म्हणाले.

#NarayanRane #NilamRane #NiteshRane #DilipWalsePatil #CentreGovernment #LookoutCircular #BJP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आठवले’ स्टाईलमध्ये Devendra Fadnavis यांचा Ajit Pawar यांना टोला

News Desk

Yedu Mata यात्रेची पूर्व तयारी पूर्ण; 2 वर्षानंतर पहिल्यांदांच पाच लाख भाविक येण्याची शक्यता

News Desk

केरळमध्ये थैमान घातलेल्या निपाह व्हायरसचा राज्यात धोका नाही, परंतु काळजी घेणे अवश्य

News Desk