HW Marathi
व्हिडीओ

राष्ट्रवादी काँग्रेस हा खरचं मराठ्यांचा पक्ष आहे का ?

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेला आता 22 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील प्रमुख प्रादेशिक पक्ष म्हणून तळागाळात पक्षाचे केडर पसरले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वावर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवून या पक्षाची वाटचाल सुरू आहे. (NCP completes 22 years) कॉंग्रेसच्या मूळ विचारधारेशी फारकत न घेता 10 जून 1999 मध्ये कॉंग्रेसमधून बाहेर पडत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या पक्षाची स्थापना केली. पवारांच्या सोबत प्रत्येक भागातील तालेवार नेते गेले. पवारांनी अनेकांना मोठे केले. मंत्रीपदे दिली अशी सारी मंडळी पवारांसोबत गेली. पक्षाच्या स्थापनेपासून मराठ्यांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेसवर शिक्का बसला. पवार यांच्यासोबत आलेले नेते हे प्रामुख्याने मराठा होते. आपापल्या भागातले ते ताकदवान होते. या पक्षाला इतर बारा बलुतेदार जातींमध्ये म्हणावा तसा विश्‍वास निर्माण करता आला नाही, असे बोलले गेले. पण ही प्रतिमा खरेच तशी आहे का?

#SharadPawar #NCP #Maratha #AmolMitkari #DhananjayMunde #AjitPawar #AmolKolhe #ChaganBhujbal #HasanMushrif #SunitTatkare

Related posts

कोरोनाला महाराष्ट्रच आवडतो काय? ‘मनसे’कडून मंत्र्यांसह राज्य सरकारवर गंभीर आरोप

News Desk

Ajit Pawar Baramati | अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर बारामतीत शुकशुकाट

Gauri Tilekar

Udayanraje Bhosale | मी हातात बांगड्या भरल्या नाहीत | उदयनराजे भोसले

News Desk