‘शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक आहे,’ असा सवाल करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (BJP Chandrakant Patil Criticizes NCP Ajit Pawar) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसंच जुनं झालं तरी खोट आहे ते खोटंच, असा हल्लाबोलही चंद्रकांत पाटील यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलेआहे. ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र कसे बाहेर आले, असे वक्तव्य पाटील यांनी केले होते. त्यावर अजित पवार यांनी पलटवार केला आहे. जी गोष्ट झालेली आहे तिला चौदा महिने झाले आहे. मागची गोष्ट उकरून काढताय, ज्यांना काम नाही ते नको त्या गोष्टी बोलतात. राज्यात करोनाचे संकट असून त्याकडे लक्ष देणे आता महत्वाचे आहे, अशा शब्दात पवार यांनी पाटील यांना उत्तर दिले आहे. (dy cm ajit pawar criticizes bjp leader chandrakant patil)
#AjitPawar #ChandrakantPatil #BJP #NCP #SharadPawar #OathCeremony #ChandrakantPatil
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.