HW News Marathi
व्हिडीओ

ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे ! निवडणूक चिन्ह ऑटोरिक्षा म्हणून उमेदवाराने घरावरच ठेवली ऑटो

राज्याच्या ग्रामपंचायत निवडणूका आता अवघ्या ४ दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. येत्या १५ जानेवारी ग्रामपंचायत निवडणुकांसाठीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर खरंतर ग्रामीण भागात सध्या गुलाबी थंडीत ग्रामपंचायत निवडणुकीने वातावरण चांगलच तापलंय. सर्व उमेदवार सरपंचपद हे एकच लक्ष्य ठेवून सर्व शक्तीनिशी प्रचाराला लागलेत. आता प्रचार आला म्हणजे उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन फंडे आजमावण्याचा मुद्दा आलाच…तर असाच एक अनोखा फंडा बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सुटाळा येथील वॉर्ड क्र. २ मधील एका उमेदवाराने आजमावला आहे… या उमेदवाराच्या मुलाने निवडणूक चिन्ह असलेली ऑटोच आपल्या घरावर दर्शनी भागात नेऊन ठेवलीय…

#GramPanchayatElection #Buldhana #SutalaGramPanchayat #Maharashtra #RuralMaharashtra #HasanMushrif #UddhavThackeray
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raju Parulekar Show EP 08 | डॉ. शीतल आमटे : आत्महत्येकडे पाहताना… | Dr Sheetal Amte | Suicide

News Desk

HW च्या सर्वेनुसार, युती तुटण्याच कारण कोण? भाजप की शिवसेना

News Desk

Pune constituency | पुणेकरांना काय वाटत ?

News Desk