महाराष्ट्रावरचे महापुराचे संकट हळूहळू कमी होत आहे. मात्र महापूर ओसरला आणि राजकीय व्यक्तींनी या महापूरालासुद्धा राजकीय संघर्षाची जोड दिली आहे.राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस महापुराचे राजकारण करून पूरग्रस्तांना राज्यसरकारविषयी भडकवत आहे असा आरोप केला . सदाभाऊंच्या या आरोपावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे .महापूर असताना सदाभाऊ तुम्ही कुठे हुंदडत होता, असा थेट सवाल आ. जितेंद्र आव्हाड यांनी सदाभाऊ खोत यांना केला आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष ८० वर्षांचा तरूण पुराची पाहणी करण्यात व्यस्त आहे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यात तब्येतीची पर्वा न करता पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी फिरत आहे.तुम्ही मात्र जो नाटकीपणा केला त्यावरून संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यावर हसत आहे . त्यामुळे आता राजकारण न करता संकटग्रस्तांचे डोळे पुसण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असे आव्हाड यांनी म्हंटले आहे.#JitendraAwhad #SadabhauKhot #NCP #BJP-Shivsena
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.