HW News Marathi
व्हिडीओ

Karuna Sharma यांना जामीन नाहीचं न्यायालयीन कोठडीतील मुक्काम १८ सप्टेंबरपर्यंत वाढला!

अंबाजोगाई सत्र न्यायालयातील करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. मात्र, करुणा शर्मा यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर मंगळवारी अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांकडून लेखी बाजू मांडली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी 18 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता करुणा शर्मा यांना आणखी काही काळ न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.

#KarunaSharma #DhananjayMunde #Beed #PanakajaMunde #Maharashtra #BJP #MahaVikasAaghadi #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यासाठी केंद्राकडून Empirical data देण्यास टाळाटाळ ? होतील दुरोगामी राजकीय बदल!

News Desk

बीडच्या शेतकऱ्याची कमाल! दुष्काळावर मात करण्यासाठी चक्क दीड एकरात खणली विहीर|

News Desk

कोरोना अपडेट – पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरेपीला केंद्राचा हिरवा कंदिल

swarit