HW News Marathi
व्हिडीओ

“कौतुकास्पद ! ‘क्वारंटाईन’ मजुरांनी गावाला दिली ‘ही’ भेट “

कोरोनाचा विळखा अक्ख्या जगाला आहे आणि ह्या विळखण्यातुन बाहेर कधी पडणार याची आपल्याला कोणालाच कल्पना नाही. संपूर्ण जग एकाच व्याधीने ग्रस्त आणि त्रस्त आणि आपण सर्वच जण सध्या एकाच परिस्थितीचा सामना करत आहोत. अशावेळी काही नकारात्मकता निर्माण होणे हे तसं साहजिक आहे. मात्र, अशा बिकट स्थितीतून जात असतानाही अत्यंत सकारात्मक विचार करणारी आणि नुसता विचार नाही तर तशी कृती करणारी लोकंही आपल्या आजूबाजूला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक स्थलांतरित मजूर आपल्या घरापासून लांब आहेत. अशाच मध्यप्रदेश आणि गुजरातच्या स्थलांतरित मजुरांना सीकर पलसना गावातील एका शाळेमध्ये क्वारनटाईन करण्यात आले होते. या क्वारंटाईनच्या काळात आपल्याला उपल्बध करून दिलेल्या सर्व सुविधांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि या गावासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेतून या मजुरांनी त्यांना क्वारंटाईन करण्यात आलेल्या त्या शाळेचे रंगकाम आपल्या हाती घेतलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Amol kolhe ,Devendra Fadnavis,Aditya Thackeray | विधानसभेसाठी यात्रांची जत्रा ..

Arati More

मुंबईत NIA ची मोठी कारवाई; Mahim दर्ग्याचे ट्रस्टीही ताब्यात

News Desk

राठोडांनंतर धनंजय मुंडे आणि आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी का होतेय ?

News Desk