शिवरायांची राजमुद्रा असलेला भगवा झेंडा पक्षाचा अधिकृत ध्वज म्हणून स्वीकारणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज्य निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. संभाजी ब्रिगेडसह राज्यातील इतर संघटनांच्या तक्रारीची दखल घेऊन आयोगानं हे पाऊल उचललं आहे. महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाचा अंदाज घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अलीकडंच झालेल्या पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात आपली राजकीय भूमिका बदलली. ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा आहे. त्यास राज्यातील काही संघटनांनी आक्षेप घेतला होता. तसंच, निवडणूक आयोगाकडं तक्रारही केली होती.