HW News Marathi
व्हिडीओ

“MPSC मायाजाल, अडकू नका” स्वप्निलच्या आत्महत्येला जबाबदार कोण ?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परिक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातुन व आर्थिक परिस्थितीमुळे एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना फुरसुंगी जवळील गंगानगर येथे घडली. स्वप्नील सुनील लोणकर असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. अधिकारी होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणाने केलेल्या आत्महत्येमुळे राज्यात आता खळबळ उडाली आहे. आपल्या आत्महत्येपूर्वी स्वप्नीलने लिहिलेली सुसाईड नोट मन हेलावून टाकणारी आहे. स्वप्निलने या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, “मी घाबरलो, खचलो मुळीच नाही. फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता, MPSC मायाजाल आहे यामध्ये पडू नका.” या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले.

#MPSC #SwapnilLonkar #SuicideCase #MPSCStudent #Pune #MVA #Suicide #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नेतृत्व कुणीही करा, आम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार” – Neelam Gorhe

News Desk

Ganeshotsav 2019 | ऐन गणेशोत्सवात बाजाराला मंदीची झळ

swarit

“मी आज BJP प्रवेश करतोय,” Shivsena कार्यक्रमात नगरसेवक म्हणताच Eknath Shinde यांना धक्का!

News Desk