HW Marathi
व्हिडीओ

NCP And BJP | ..त्या पत्रामागे भाजपचा हात, राष्ट्रवादीचा आरोप !


पुणे शहर पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करताना मराठा समाजाचा निकष वापरल्याचा आरोप करत पक्षाच्या कार्यकर्त्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मात्र संबंधित व्यक्तीने हा पत्रात स्वतःचे नाव लिहिले नसून पक्षाच्या शहर कार्यकारिणीच्या निवडीबाबत नाराजी व्यक्त करत पदाधिकाऱ्यांना पत्राची प्रत पाठवणार असल्याचे नमूद केले आहे. याच पत्रावर आता विविध प्रतिक्रिया उमटत असून माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी तर थेट सत्ताधारी भाजपवर आरोप केले आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या होत्या. त्यात महिला, युवती, युवक, विद्यार्थी अशा विभागांचा समावेश होता. आता त्या नेमणुकांबाबत एका कार्यकर्त्याने थेट नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात माजी शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.त्यावर आता चव्हाण यांच्यासह काकडे यांनीही प्रतीक्रिया दिली आहे. #NCP #BJP #SambhajiBhide #RamdasAthawale

Related posts

मजा म्हणून फेकायचा ‘तो’ महिलांवर केमिकल

News Desk

Pulwama attack | लष्कराकडून दहशतवाद्यांचा खात्मा!

News Desk

दादर स्थानकाचे नामांतर करा !

News Desk