HW News Marathi
व्हिडीओ

Dhananjay Munde यांचा आपल्याच आमदारांना ‘शह’?; नव्या रणनितीसह विरोधकांशी वाढतेय जवळीक

नुकत्याच पार पडलेल्या बीड येथील जिल्हा परिषदेच्या इमारतीचे लोकार्पण आणि महापुरुषांसह लोकनेत्यांच्या पुतळ्यांच्या भूमिपुजनाला शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांची उपस्थिती आणि त्यानंतर विकास कामांच्या निमित्ताने डॉ. भारतभूषण क्षीरसारांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन केलेला सत्कार हा एक साधा सोहळा नाही किंवा हा काही योगायोग नाही असं आता म्हटलं जात आहे. कारण, आता राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे कि या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर व आमदार प्रकाश सोळंके यांना यानिमित्ताने नव्या राजकीय समीकरणांचा ट्रेलर दाखवला आहे. पण आपल्याच आमदारांसोबत धनंजय मुंडे असं का करतील? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बीडच्या कायदा व सुव्यावस्थेबद्धल लक्षवेधी मांडून अडचणीत आणल्यामुळे धनंजय मुंडे आपल्याच आमदारांना हे इशारे देत नाहीयत ना? जाणून घेऊया

#DhananjayMunde #PankajaMunde #SandeepKshirsagar #PrakashSolanke #PritamMunde #BeedPolitics #MaharashtraPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nawab Malik यांना सत्र न्यायालयाचा दिलासा; काय म्हणाले वकील Nilesh Bhosle?

News Desk

Mumbai on high alert | मुंबईसह अनेक शहरांमध्ये हाय अलर्ट

Atul Chavan

कास बांधकामप्रश्नी स्थानिकांच्या पाठीशी उभे राहून मुख्यमंत्र्याना भेटणार – Shivendra Raje Bhosale

Manasi Devkar