HW News Marathi
व्हिडीओ

पंकजा मुंडे ओबीसींच्या प्रश्नांमुळे भाजपमध्ये चमकणार ?

ओबीसी आरक्षणासाठी येत्या 26 जून रोजी भाजपने राज्यव्यापी चक्काजामची हाक दिली आहे. ओबीसी नेत्यांच्या काहीच दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. यादृष्टीने आता भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे कामाला लागले आहेत. मात्र, सर्वांचं विशेष लक्ष आहे ते पंकजा मुंडेंवर. कारण विधानसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे पक्षात एकदम बाजूला पडल्यासारख्या झाल्या. केंद्रात संघटनेच्या कामात संधी मिळाली पण त्याचा काही विशेष फायदा पंकजांना नाही तर त्यांचेसमर्थकही नाराजच आहेत. मात्र, आता पंकजा मुंडे यांना ओबीसी आरक्षणाच्या निमित्ताने पुन्हा पक्षात आपली स्वतंत्र जागा निर्माण करण्याची संधी मिळतेय. पंकजा ह्याचा फायदा करून घेणार का ? त्यांना ते शक्य होणार का ? हे प्रश्न आहेत.

#PankajaMunde #OBCReservation #OBC #BJP #GopinathMunde #EknathKhadse #DevendraFadnavis #UddhavThackeray #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गडकरींनी दिल्लीत ‘भारत सरकार’चा बोर्ड उखडून ‘महाराष्ट्र सरकार’ चा लावला…

News Desk

Jammu Kashmir | तब्बल १४ दिवसानंतर जम्मू-काश्मीरमधील शाळा पुन्हा सुरु

Gauri Tilekar

तब्बल 150 गावांना अचानक महाराष्ट्र का नकोसा?

Manasi Devkar