HW News Marathi
व्हिडीओ

बुलढाण्यात एक असंही गाव! गुराढोरांचंच पाणी पिण्याची वेळ, पत्र्याची शाळा अन् मतदानाचा हक्क दूरच

प्रत्येक सरकार आपल्या नागरिकांना वारंवार अत्याधुनिक सुविधा देण्याची मोठमोठी आश्वासने देते. पण जर एखाद्या राज्यातील नागरिकांना प्राथमिक सुविधा मिळवण्यासाठीच वणवण करावी लागत असेल, झगडावं लागत असेल तर? बुलढाण्यात मोताळा तालुक्यात अशी परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या मोताळा तालुक्यातील अतिक्रमणमध्ये वसलेल्या एका गावांमधील नागरिकांना मतदान काय असते हे सुद्धा अद्याप माहीत नाही एवढेच काय तर त्यांना मतदानाचा अधिकार सुद्धा आहे की नाही हेसुद्धा त्यांना माहीत नाही त्यामुळे प्राथमिक सुविधा दूरच आहे ..मोताळा तालुक्यातील मोताळा ते बुलढाणा या रोड वरती मोहेगाव पासून काही अंतराळ बसलेल्या माळेगाव वस्ती हे गाव गेल्या 35 वर्षांपूर्वी वन विभाग जागेवरती अतिक्रमण करून या ठिकाणी बसले आहे या ठिकाणी त्यांनी वन विभागाची हजारो एकर जमीन या ठिकाणी काढून त्याच्यावर तिचे सध्या उदरनिर्वाह करत आहे…. मात्र गेल्या 35 वर्षांपासून अद्यापही त्यांना जमीन मिळाली नाही…. तर त्या गावांमध्ये अद्याप एकही सुख सुविधा त्यांना मिळाली नाही. गावामध्ये वीजसुद्धा नाही. पिण्याच्या पाण्याचे हाल आहे. एका बाजूला गुरे दोरे पाणी पितात तर दुसर्‍या बाजूला या ठिकाणी माणसं सुद्धा पाणी पितात…. शिक्षणात जर विचार केला तर या ठिकाणी जिल्हा परिषद ची पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे….. मात्र ती शाळा सुद्धा या ठिकाणी गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून उभारूली आहे ती सुद्धा टिन पत्र्याच्या असून त्या ठिकाणी मुलं शिक्षण घेतात राज्य शासनाच्या धोरणानुसार गाव तेथे शाळा हा जरी उपक्रम राबवत असला तरी मात्र त्या विद्यार्थ्यांना खरंच या ठिकाणी दर्जेदार शिक्षण मिळते का हा मोठा प्रश्न आहे. याच पार्श्वभूमीवर या गावातील हि विदारक स्थिती जाणून घेतलीय आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी शिवाजी म्हामणकर यांनी

#Buldhana #BuldhanaNews #UddhavThackeray #Maharashtra #Motala #ThackerayGovernment #MalegaonVasti

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेनंतर NCP पक्ष फोडण्याचा भाजपचा डाव : Rohit Pawar

Seema Adhe

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीने मांडली ‘ही’ मोठी भूमिका!

News Desk

बीडमध्ये चर्चा पंकजा मुंडेंच्या स्पेशल ‘PM चहा’ची

Manasi Devkar