HW Marathi
व्हिडीओ

Raju Parulekar Show EP 04 | बाईचा उत्सव | Women Empowerment | Smash Patriarchy

हाथरस अत्याचार प्रकरणाने संपूर्ण देशात वादळ उठले. देशात यापूर्वीही अनेक महिला अत्याचाराच्या अत्यंत धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. ज्या घटनांनी देश, समाज म्हणून आपल्याला हादरवून सोडलं. मात्र, व्यवस्थेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना नैतिक बळ देण्याची मात्र ही पहिलीच वेळ होती. पूर्वापार आपल्या समाजात रुजत आलेली पितृसत्ताक परंपरा, मनोरंजन आणि राजकीय विश्वाने त्याला वेळोवेळी घातलेलं खतपाणी, समाजाची खालावत चाललेली मानसिकता आणि त्यामुळे आपण पाहतोय ती सद्यस्थिती एक भयाण वास्तव आहे. आपल्याकडे पितृसत्ताक परंपरेला एवढं मोठं मानलं जातं की त्यापुढे ‘स्त्री’चं भोग्य असणं हे अत्यंत स्वाभाविक मानलं जातंय. अशा वेळी त्या ‘स्त्री’च्या स्वतंत्र अस्तित्त्वाला कोणताही मान दिला जात नाही आणि जेव्हा हीच राजयकीय विचारसरणी तुमच्यावर स्वामित्व गाजवते तेव्हा सगळेच मार्ग बंद होतात. केवळ स्त्रियांचेच नव्हे तर पुरुषांचेही. मग आपण एका अंधार युगात लोटले जातो. त्यानंतर त्या देशाचे आणि समाजाचे काय ?
#RajuParulekarShow #MissionShakti #मिशनशक्ति  #Navratri2020 #Navaratri #Maharashtra #WomenEmpowerment #SmashPatriarchy #Patriarchy

Related posts

BJP MLA Charan Waghmare | भाजप आमदाराला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक

Gauri Tilekar

कांदा आणि ऊस उत्पादकांची फरफट कायमच!

Atul Chavan

Maharashtra Winter Session। सावरकर अन् शिवस्मारकातील भ्रष्टाचारामुळे गाजला अधिवेशनाचा पहिला दिवस

Gauri Tilekar