HW News Marathi
व्हिडीओ

“१२ घ्या आणि १२ द्या” भाजप-महाविकासआघाडीत होणार आमदारांची मांडवली?

सोमवारी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. केंद्राकडून इम्पिरिकल डेटा मागवण्यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला तो संमत करताना विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. त्यानंतर अध्यक्षांच्या दालनामध्ये पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ करुन अंगावर धावून जाण्याच्या प्रयत्न करत गैरवर्तन केल्याचा ठपका ठेऊन १२ आमदारांचे निलंबन करण्यात आलं आहे. मात्र या निलंबनाच्या कारवाईनंतर विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची चर्चा पुन्हा नव्याने सुरु झाली आहे. भाजपाने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी रोखून नियुक्त्या रखडवल्याने महाविकास आघाडीने भाजपाचे १२ आमदार निलंबित केले का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे

#UddhavThackeray #SharadPawar #DevendraFadnavis #BhagatSinghKoshyari #BJP #MVA #MahaVikasAghadi #MLS #MLC #MaharashtraAssembly #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kirit Somaiya यांचा नवा गौप्यस्फोट! सुमारे १५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा…

News Desk

ऋतुजा लटकेंची निष्ठा मातोश्रीवर ठाम?

Manasi Devkar

Dhangar Reservation | धनगर आरक्षणाबाबत लेखी आश्वासन द्या!

Arati More