HW News Marathi
व्हिडीओ

Sambhaji Bhide | शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कामाचं जवानांकडून कौतुक ..

कोल्हापूर आणि सांगलीतील भीषण पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. त्यामध्ये, स्थानिक कोल्हापूर आणि सांगलीतील नेते, सामाजिक संघटना, समाजसेवक यांसह अनेकांनी मदतीसाठी स्वत:ला झोकून देऊन काम केले. मात्र, सांगलीकर असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संघटनेचे संभाजी भिडे कुठे आहेत? असा प्रश्न अनेकांनी सोशल मीडियावर उपस्थित केला होता. या प्रश्नाला आता खुद्द सैन्यातील जवानांनी सॅल्यूट करुन उत्तर दिले आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना अतिशय मजबूत असून आम्हाला त्यांचा अभिमान आहे. संघटनेचे जेवढे कार्यकर्ते आहेत, त्यांना माझा सॅल्यूट आहे. सचिन मोहिते या बिचाऱ्याने तर आम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मदत केली. आमच्या खायचं, राहायचं, नाश्त्याचं सर्वकाही बघत होता. आमचं काम तर त्यानी पाहिलंच, पण आम्हाला शेवटी जाण्यासाठीही त्यानं मदत केली. संघटनेच्या अनेक मित्रांनी या कामी आम्हाला मदत केली, सर्वांची नाव मला माहिती नाहीत. त्यामुळे, मी सर्वांचे आभार मानतो, अशा शब्दात सैन्य दलाच्या एका तुकडीने संभाजी भिंडेंच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या कार्याचं कौतुक केलं आहे. #SambhajiBhide #Shivpratishthan #KolhapurFlooods #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर आम्ही पुन्हा शेतकऱ्यांना ५ वर्षे वीज मोफत देऊ”; Chandrashekhar Bawankule यांचं वचन |

News Desk

Devendra Fadnavis BJP | राज्यातील सत्तासथापनेबाबत केल्या जाणाऱ्या वक्तव्यांवर मी बोलणार नाही !

Gauri Tilekar

Budget 2019 | बजेटमधून आम्हांला काय मिळालं ?

swarit