भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार असल्याचं माझ्या कानावर आलं. त्यांना राज्यपालपदाची ऑफर आली होती. त्यामुळेच त्यांनी माजी मंत्री म्हणू नका असं म्हटलं असावं, असा चिमटा शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाटील यांना लगावला आहे. (chandrakant patil will become nagaland governor, says sanjay raut)शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना त्यांनी हा टोला लगावला. चंद्रकांत दादा हे आमचे मित्रं आहेत. राजकारणात आम्ही एकमेकांवर टीका करत असतो. ते म्हणाले माजी मंत्री म्हणू नका. चमत्कार होणार आहे. चंद्रकांतदादा अवतारी पुरुष आहे. चमत्कारी पुरुष आहेत. ते काही तरी चमत्कार घडवतील. पण माजी मंत्री म्हणण्मयाची त्यांची वेदना समजू शकतो.मी त्यांना निरोप पाठवला आहे. तुम्हाला 25 वर्षे माजी मंत्री म्हणूनच राहावे लागेल. उद्धवजींच्या नेतृत्वात सरकार कायम राहणार आहे. त्यांनी मनाची तयारी करावी. स्वप्न बघण्यावर कोणताही टॅक्स लागेला नाही. जीएसटी लागलेला नाही. ते नागालँडचे राज्यपाल होणार आहेत. त्यांना ऑफर आ#ChandrakantPatil #SanjayRaut #NarendraModi #MahaVikasAaghadi #BJP #shivsena #maharashtra ली असं माझ्या कानावर आलं. त्यामुळे त्यांना माजी म्हणून घ्यायचं नसेल, असं राऊत म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.