HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला,संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया…

राज्यातील ज्वलंत विषय असणाऱ्या मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. मराठा आरक्षणावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. या बैठकीतून मराठा आरक्षणावर तोडगा नक्कीच निघेल, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. दरम्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठकीला दिल्लीत सुरुवात झाली आहे.शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज (८ जून) माध्यमांशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात मोर्चे निघत आहेत. आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावर गंभीरपणे विचार करत आहेत. मराठा आरक्षणावर काळजीपूर्वक काम करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज मोदींना भेटत आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आहेत. या भेटीतून मराठा आरक्षणावर तोडगा निघेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

#narendramodi #uddhavthackeray #marathareservation #sanjayraut #bjp #shivsena #mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narayan Rane विरूद्ध Shivsena दुसरा अंक सुरू होणार ? कोकणातील ‘ती’फाईल उघडणार?

News Desk

“राज्य सरकारकडून मदत निश्चीतच! पण केंद्राकडून मात्र मदतीचा हात आवश्यक”- Shivsena खासदार

News Desk

Balasaheb Thackeray यांनी दिलेले ‘संकेत’ खरे ठरणार?

Manasi Devkar