आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या १७ सप्टेंबरपासून विधानसभा निवडणुकीकरिता राज्यव्यापी दौर्यावर असणार आहेत. आपल्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १७ सप्टेंबरला शरद पवार सोलापूर आणि उस्मानाबादचा दौरा करणार आहेत. यावेळी ते राष्ट्रवादीच्या उस्मानाबादमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. याच पार्श्वभूमीवर आज आमदार विक्रम काळे आणि जिल्हाध्यक्ष सुरेश बिरासदार यांच्या नेतृत्त्वाखाली उस्मानाबाद जिल्ह्यातील नेत्यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. मात्र, या कार्यकर्त्या मेळाव्यात कार्यकर्त्यांची संख्या अंत्यत कमी होती. इतकेच नव्हे तर उस्मानाबाद राष्ट्रवादीची धुरा सतीश चव्हाण, राहुल मोटे, विक्रम काळे या ज्या ३ प्रमुख आमदारांकडे आहे त्यांपैकी २ म्हणजेच सतीश चव्हाण, राहुल मोटे देखील या मेळाव्याला गैरहजर होते. यैपैकी राहुल मोटे यांच्याशी संपर्क साधला असता ते काय म्हणाले जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अजहर शेख यांच्याकडून…
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.