HW News Marathi
व्हिडीओ

शिवसेना आणि भाजपने ‘मनसे’ला पाडले खिंडार! राज ठाकरेंच्या निष्ठांवंतांनी सोडला पक्ष

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेनेतील इनकमिंग वाढतच आहे. आता तर मनसेचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवलीत मनसेला शिवसेनेने मोठे खिंडार पाडले आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच डोंबिवलीचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे यावेळी स्वतः उपस्थित राहत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रवेशाला महत्व दिले.इतकेच नव्हे तर राजेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेला खिंडार पडले आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मनसेचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

#RajThackeray #MNSAdhikrut #UddhavThackeray #DevendraFadnavis #RajuPatil #KDMC #KalyanDombivli #RajeshKadam #MandarHalbe #Dombivli #MNS

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raigad मध्ये संशयित बोट आढळल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

News Desk

‘भाजपचा प्रदेशाध्यक्ष मीचं राहणार’ Chandrakant Patil यांना विश्वास, Narayan Rane म्हणाले…

News Desk

शिंदे-ठाकरेंच्या वादानंतर आता Raj Thackeray यांची एंट्री!, Uddhav Thackeray यांचं टेन्शन वाढलं MNS

Manasi Devkar