HW News Marathi
व्हिडीओ

‘त्या’ बलात्काराच्या आरोपावरून मेहबूब शेख विरूद्ध चित्रा वाघ वाद पेटला!

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक मेहबूब यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. “जर एखादा सर्वसाधारण आरोपी असता तर तर त्याला लगेच अटक केली असती मग आता राजकीय पदाधिकाऱ्याला आणि विशेष म्हणजे सत्तेतील पक्षातल्या एका पदाधिकाऱ्याला वेगळा न्याय का?”, असा सवाल करत औरंगाबाद पोलिसांनी पीडितेला न्याय मिळवून द्यावा आणि आरोपीला जेरबंद करावं, अशी मागणी केली होती आणि महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी सडकून टीका देखील केली होती. मात्र आता राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. या तक्रारीत मेहबूब शेख म्हणतात की, १८ जुलै २०२१ रोजी बीड जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी एकनाथ पवार यांच्या घरी भाजप नेत्या चित्रा वाघ आल्या होत्या. यावेळी शिरुर येथे माझी बदनामी व्हावी यासाठी माझ्यावर बलात्काराचा आरोप केला. तसेच राज्य सरकार मेहबूब शेखला अटक करत नाही तर मात्र वाघ यांनी केलेल्या आरोपाचा व्हिडीओ काही पत्रकार मित्रांनी मला दाखवला, जो पाहिल्यानंतर मला खूप मनस्ताप झाला. माझी समाजात बदनामी झाली अस शेख म्हणतात.

#ChitraWagh #MehboobShaikh #Aurangabad #BJP #NCP #Maharashtra #RapeCase

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुंड गजा मारणेला ‘सिंघम’स्टाईल पोलिसांनी कसं पकडलं? पाहा थरारक CCTV फुटेज !

News Desk

शेतकऱ्यांना दिलासा देत ठाकरे सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय! राजू शेट्टींनीही मानले आभार

News Desk

नवशक्ति : अंधत्वावर मात करत ‘ती’ वाजविते ६० प्रकारची वाद्ये

News Desk