HW News Marathi
व्हिडीओ

सरकारपुढे मोठे आव्हान! केंद्राने थकवले राज्याचे तब्बल तब्बल १ लाख कोटी

महाविकासआघाडी सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर काहीच महिन्यांमध्ये कोविडसारखे जागतिक संकट आले आणि राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारमधील मोठ्या नेत्यांनी वारंवार केंद्राकडे हि करत हि बाब लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्राकडे राज्य सरकारचा मोठा निधी अडकून पडला आहे आणि यावरून गेल्या अनेक महिन्यांमध्ये राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सतत खडाजंगी झालेले देखील पाहायला मिळते. दरम्यान, हा निधी नेमका किती ? तर केंद्र सरकारने अद्याप तब्बल ९६ हजार ९८७ कोटी ५४ लाख रुपयांचा विविध योजनांपोटीचा राज्याचा निधी दिलेला नाही. त्यामुळे ही न मिळालेली रक्कम, कोरोनाचे संकट, राज्यात उत्पन्नाचे कमी झालेले मार्ग, आस्थापनेवरील खर्चात झालेली प्रचंड वाढ त्यामुळे राज्याचा रुळावरून घसरलेला गाडा पूर्वपदावर आणण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारपुढे आहे.

#AjitPawar #UddhavThackeray #NarendraModi #NirmalaSitharaman #MaharashtraBudget2021 #StateBudget #Maharashtra #MVA #JayantPatil #MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Prakash Surve, Santosh Bangar, Nitesh Rane यांसारख्यांचा सरकारला पाठिंबा: Ambadas Danve

Seema Adhe

“Kalidas Kolambkar may join BJP | काँग्रेस आमदार ‘कालिदास कोळंबकर’ भाजपमध्ये प्रवेश करणार ? “

Atul Chavan

शरद पवारांच्या संकेतानंतर खडसेच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या हालचालींना वेग!’हा’नविन मुहूर्त …

News Desk