मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या (Maratha Arakshan) मुद्यावर खासदार उदयनराजे भोसलेंनी अनेकांची भेट घेतली. आता मात्र त्यांनी थेट महाविकास आघाडीसरकारला इशारा दिला आहे. उदयनराजेंनी खरंतर ‘मराठा समाजाला आरक्षण तरी द्या; अन्यथा आम्हाला विष पिऊन मरु द्या’, या मथळ्याखाली फेसबुक पोस्ट करत आपला राग व्यक्त केला होता. मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात. आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या, अन्यथा विष पिऊन मरु द्या, असं म्हणतं सरकारला इशारा दिला होता. मात्र आता, उदयनराजेंनी ह्याहुनही आक्रमक पवित्रा घेतला आहे. “आता विष पिणार नाही ह्यांना पाजणार”, असे उदयनराजे म्हणाले.
#UdayanrajeBhosale #AjitPawar #SharadPawar #MarathaReservation #Maharashtra #MVA#MahaVikasAaghadi
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.